वर्षासहल

ज्या अनेक उपक्रमांचा प्रारंभ चतुरंग संस्थेकडून झाला त्यातील एक म्हणजे वर्षासहल ! पावसाळ्यात नाट्य ,चित्र, साहित्य, अशा विषयातील एखाद-दोन कलावंत मंडळींना बरोबर घेऊन हि सहल योजली जाते . दिवसभरात भरपूर खेळ, उत्तम खानपान, कलावंतांचा दिवसभराचा सहवास व सहभाग आणि संध्याकाळी त्या कलाकारांसोबत मुक्त गप्पा गोष्टी असा भरगच्च कार्यक्रम असतो. या सहलीचे आकर्षण रसिकांनाच नव्हे तर येणाऱ्या कलाकारालाही वाटते. वास्तवात जेवढा खर्च असेल, तेवढेच शुल्क सहभागींकडून  घेतले जाते. अलीकडच्या काळात अशा व्यावसायिक सहलींनीचे पेव फुटले असले तरी चतुरंग वर्षासहल मात्र आपले वेगळेपण खचितच टिकवून आहे.