चैत्रपालवी संगीतोत्सव – गोवा

रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता चतुरंग प्रतिष्ठान गोवा केंद्रातर्फे 'चैत्रपालवी संगीतोत्सव' हा कार्यक्रम फोंडा येथील क्रांती मैदानावर संपन्न झाला. अभिजात शास्रीय संगीत युवक संमेलन अशा स्वरूपातला हा कार्यक्रम तीन सत्रात सादर झाला. पहिल्या सत्रात युवा कलाकार सौ. वीणा मोपकर यांचे गायन सादर करण्यात आले त्यांना तबला साथ केली होती श्री. शशांक उपाध्ये यांनी व संवादिनी साथ होती श्री. अनय देविदास घाटे यांची. रसिकाग्रणी श्री. सागर पानवेलकर यांनी सौ. वीणा मोपकर यांचे स्वागत केले. दुसऱ्या सत्रात युवा कलाकार श्री. पुनीत गडेकर यांचे तबला वादन झाले त्यांना लेहरा साथ श्री. साहिल मामल यांनी केली. श्री. पुनीत गडेकर यांचे स्वागत रसिक प्रतिनिधी श्री. श्रीपाद फेणाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

तिसऱ्या व शेवटच्या सत्रात बुजुर्ग कलाकार श्री. दामोदर च्यारी यांचे शास्त्रीय गायन सादर करण्यात आले त्यांना तबला साथ केली श्री. शशांक उपाध्ये यांनी तर संवादिनी साथ होती श्री. अनय घाटे यांची. श्री. दामोदर च्यारी यांच्या शिष्या कु. प्राची जठार आणि आणि शिष्य चैतन्य कोरडे यांनी त्यांना तानपुरा साथ केली. गानरसिक आणि संगीत शिक्षक श्री. नितीन ढवळीकर यांनी श्री. दामोदर च्यारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

चतुरंग प्रथेप्रमाणे सर्व कलाकारांना श्री. उल्हास वेलिंगकर व श्री. राया कोरगावकर यांच्या हस्ते चैत्रपालवी सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 

कार्यक्रमाचे उद्घाटन गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक श्री. संदीप निगळ्ये यांनी सरस्वती पूजन करून केले. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारापाशी सुंदर असे चैत्रांगण सौ. अपर्णा खेडेकर यांनी रांगोळी द्वारा प्रस्तुत केले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित सर्वांनी चैत्र पेयाचा (पन्हे) आस्वाद घेतला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 07 मे 2023  06:30 PM
ठिकाण
गोवा
पत्ता
क्रांती मैदान, फोंडा, गोवा