शिक्षक संमेलन

गेली सुमारे २८ हून अधिक वर्षे कोकणात अभ्यासवर्गांचे आयोजन होते आहे. या विविध प्रकारच्या अभ्यासवर्गांच्या निमित्ताने चतुरंगचा अनेक शिक्षकांशी परिचय होतो. त्यांच्या सोबत कौटुंबिक पातळीवरही मैत्री निर्माण होते. एकच विषय शिकविण्यासाठी वर्षभरात वेगवेगळे शिक्षक अभ्यासवर्गात सहभागी होत असतात. या साऱ्यांच्या शिकवण्यामधे एकसूत्रीपणा, एकजिनसीपणा यावा यासाठी एकेका विषयांशी संबंधित सर्व शिक्षकांचे एकत्र भेटणे झाले तर ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधिक उपयोगाचे होईल, हे लक्षात आल्यावर शिक्षकांच्या एकत्रीकरणाची पर्यायाने चतुरंग शिक्षक संमेलनाची संकल्पना विचारात आणि कृतीत आली. शिक्षक संमेलनाच्या निमित्ताने सर्व विषयांच्या वर्षभराच्या पोर्शनची उपलब्ध कालावधीतली नेमकी रचना त्या त्या विषयांचे शिक्षक आपापसातील चर्चांमधून नक्की करू शकतात. त्याचवेळी त्यांचा परस्पर स्नेह दृढ होणे संस्थेच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. अभ्यासासारख्या गंभीर विषयासोबत शिक्षक संमेलनात मोकळेपणाही असावा यासाठी अभ्यासेत्तर अशा काही कार्यक्रमांचे, गप्पागोष्टींचे, खेळांचेही आयोजन केलेले असते. सर्वसाधारणपणे दोन-तीन वर्षांच्या कालावधीने या संमेलनाचे आयोजन करण्यात येते.