अभिमान मूर्ती पुरस्कार प्रदान सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी त्रिमूर्ती भवन प्रधानमंत्री वस्तुसंग्रहालय सभागृह, दिल्ली
चतुरंग प्रतिष्ठानचा अभिमान मूर्ती पुरस्कार प्रदान सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी त्रिमूर्ती भवन प्रधानमंत्री वस्तुसंग्रहालय सभागृह, दिल्ली येथे संपन्न झाला.२०१८ साली हा पुरस्कार स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना (मरणोत्तर) जाहीर केला. हा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनी स्वीकारला. या सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट चे पदाधिकारी महेशचंद्रजी शर्मा उपस्थित होते. हा पुरस्कार कायमस्वरूपी जतन करण्यासाठी अटलजींच्या कुटुंबीयांनी प्रधानमंत्री वस्तू संग्रहालयाला सुपूर्द केला. प्रधानमंत्री वस्तू संग्रहालयाच्या वतीने चेअरमन न्रिपेंद्र मिस्रा यांनी तो स्वीकारला.
बाईपण भारी देवा
केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाची भारी टीम चतुरंगच्या मुक्तसंध्या उपक्रमातंर्गत मुलाखतीद्वारा रसिकांशी या चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी रविवार , दिनांक १३ ऑगस्ट , २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात डोंबिवली पूर्वेतील सुयोग मंगल कार्यालयात जमली होती. दिग्दर्शक श्री.केदार शिंदे यांच्यासह जियो सिनेमाचे श्री.निखिल साने आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते , सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांना बोलतं करुन त्यांच्याशी गप्पांद्वारा या चित्रपटाचा प्रवास उलगडून दाखविण्यासाठी मुलाखतकाराच्या भूमिकेत होत्या अत्यंत अभ्यासू आणि मर्मज्ञ अशा सुप्रसिद्ध निवेदिका , सूत्रसंचालक डॉक्टर समीरा गुजर-जोशी.
" संस्कृतीचे भान राखत, जतन करत भारताला विश्वगुरू व्हायचे आहे " चतुरंग मुक्तसंध्येत शरद पोंक्षेंचे प्रतिपादन.
चतुरंग प्रतिष्ठान तर्फे आयोजित स्वातंत्र्याचे पूर्वरंग उपक्रमात प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि वक्ते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाला रत्नागिरीकर रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
३२ वे डोंबिवली रंगसंमेलन आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा
३२ व्या डोंबिवली रंगसंमेलानात दुर्ग संशोधक - लेखक श्री. बाळकृष्ण तथा अप्पा परब यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ATS प्रमुख श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत श्री. सुधीर जोगळेकर, श्री. वासुदेव कामत, सौ. मंजिरी मराठे आदी उपस्थित होते.
३० वे गोवा रंगसंमेलन
३० व्या गोवा रंगसंमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, सुधीर जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
३१ वे पुणे रंगसंमेलन
३१ व्या पुणे रंगसंमेलनात डॉ. प्रभाकर मांडे यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत निवड समिती अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. गो. बं. देगलुरकर, डॉ. नितीन करमळकर आदी मान्यवर उपस्थित होते.