गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा

दिवाळी सुट्टीत योजल्या जाणाऱ्या हुषार मुलांच्या निवासी अभ्यासवर्गातील आणि कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांच्या निर्धार निवासीवर्गातील, शालांत परीक्षेत उत्तम गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव सोहळा सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी साकार होतो. उत्तम गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येते. याच सोहळ्यात स्व. प्रतिभा मोने आणि स्व. चिंतामणी काणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३०००/- प्रमाणे चतुरंग शिष्यवृत्ती देण्यात येते.  या निमित्ताने निमंत्रित केलेल्या मान्यवर व्यक्तीचे अभ्यासविषयक विचार ऐकण्याचा योग अभ्यासवर्ग संबंधित विद्यार्था, पालक, कार्यकर्त्यांसोबत चिपळूणकर रसिकांनाही येतो.