सवाई एकांकिकोत्सव 2023 : गोवा

चतुरंग प्रतिष्ठानच्या गोवा शाखेने दि. 5 मार्च 2023 रोजी दुसरा एकांकिकोत्सव आयोजित केला. या एकांकिकोत्सवासाठी सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतील तीन एकांकिकांची निवड करण्यात आली होती. हा एकांकिकोत्सव रविवार दि. 5 मार्च रोजी सकाळी 9 वाजता साखळी येथील रवींद्र भवन येथे तर संध्याकाळी 7 वाजता राजीव गांधी कला मंदिर-फोडा येथे संपन्न झाला. महोत्सवासाठी अभिनय या संस्थेची `जीर्णोद्धार', इंद्रधनू, मुंबई-डोंबिवली प्रस्तुत `मानलेली गर्लफ्रेंड' व जिराफ थिएटर-टिटवाळा प्रस्तुत स्टार या तीन एकांकिकांचा समावेश होता. 

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 05 मार्च 2023  09:00 AM
ठिकाण
सकाळी 9 वाजता साखळी येथील रवींद्र भवन
संध्याकाळी 7 वाजता राजीव गांधी कला मंदिर-फोडा
पत्ता
रवींद्र भवन ,साखळी ,गोवा
राजीव गांधी कला मंदिर-फोडा,गोवा