स्वातंत्र्याचे पूर्वरंग
स्वतंत्र भारतातील आजच्या पिढीला स्वातंत्र्यपूर्व काळातील मंडळींनी केलेल्या हौतात्म्याचे स्मरण करून द्यावे , त्यांच्या योगदानाला अभिवादन करावे म्हणून चतुरंग चिपळूण शाखेद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि. १४ ऑगस्ट रोजी 'स्वातंत्र्याचे पूर्वरंग ' या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामधे वेगवेगळ्या हुतात्म्यांचे जीवनदर्शन घडवणे तसेच स्मरणीय ,वंदनीय स्वातंत्र्ययोद्धे यांच्यावर त्या विषयातील अभ्यासकांचे व्याख्यान , कधी कीर्तन ,प्रवचन अशा स्वरूपातील कार्यक्रम योजला जातो.