सवाई एकांकिकोत्सव 2023 : पुणे

रविवार, दि. 5 फेब्रुवारी 2023 या दिवशी सायंकाळी 5 ते रात्रौ. 9 या वेळेत भरत नाट्य संशोधन मंदिर-पुणे येथे सवाई स्पर्धेतील निवडक तीन एकांकिकांचा सवाई एकांकिकोत्सव (वर्ष 5वे) साकार झाला. इंद्रधनू, मुंबई प्रस्तुत `मानलेली गर्लफ्रेंड', जिराफ थिएटर, टिटवाळा प्रस्तुत `स्टार' आणि मिलाप थिएटर टूगेदर, पुणे प्रस्तुत `लेखकाचा कुत्रा' या एकांकिका या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. पुणेकर रसिकांनी या एकांकिकोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या एकांकिकोत्सवासाठी अभिनेते श्री. प्रवीण तरडे यांची विशेष उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 05 फेब्रुवारी 2023  05:00 PM
ठिकाण
भरत नाट्य संशोधन मंदिर-पुणे
पत्ता
भरत नाट्य संशोधन मंदिर-पुणे