दीपसंध्या

दिवाळी हा सण घरोघरी साजरा होतोच. चतुरंगने या सणाला सामाजिक परिमाण प्राप्त करून दिले ते `दिवाळी पहाट मैफल' या उपक्रमाच्या स्वरूपात ! या संदर्भात सविस्तर माहिती यापूर्वा दिलेली आहेच. त्याच दिवाळी पहाट उपक्रमाची रांगोळ्या, पणत्या, आकाश कंदील, फराळ, सामाजिक संस्थेला भाऊबीज भेट आणि संगीत मैफल ही सर्व वैशिष्टये कायम ठेवून प्रतिष्ठानने हा उपक्रम आधी गोव्यामधे आणि आता डोंबिवलीमधे स्थानिक रसिकांच्या सोयीसाठी सायंकालीन वेळेत योजला आहे तो `दीपसंध्या' या नावाने !