मृत्युंजय लढवय्ये सावरकर - श्री. पार्थ बावस्कर
चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याचे पूर्वरंग या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. पार्थ बावस्कर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वा. सावरकरांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेला १०० वर्षे पूर्ण झाली. या घटनेला स्मरून रत्नागिरीतील संघाच्या सभागृहामध्ये सावरकरांचा संघर्षमय जीवनपट 'मृत्युंजय लढवय्ये सावरकर' या शीर्षकाखाली उलगडला.
कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी प्राचार्य डॉ. कुलकर्णी सर आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे स्वा. सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेल असताना शिरगाव येथे कै. विष्णुपंत दामले यांच्या घरी वास्तव्यास होते. हे संपूर्ण दामले कुटुंबीय कालच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.