म्रुत्यूंजयी लढवय्ये सावरकर, गोवा
चतुरंग प्रतिष्ठान आणि शांतादुर्गा शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचे पूर्वरंग कार्यक्रमाअंतर्गत मृत्युंजय आणि लढवय्ये सावरकर या विषयावर व्याख्यान दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी श्री शांतादुर्गा शिक्षण समितीच्या सौ. अन्नपूर्णाबाई माधवराव ढवळीकर हायर सेकंडरी स्कूल ऑफ सायन्स कवळे फोंडा येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लेखक नाट्यदिग्दर्शक श्री पार्थ बावसकर लाभले होते. त्यांनी मृत्युंजय आणि लढवय्ये सावरकर या विषयावर उत्कृष्ट असे व्याख्यान दिले, सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान त्यांचा खडतर प्रवास अंदमानची जन्मठेपेची शिक्षा , देशासाठी केलेली क्रांती, समुद्रात घेतलेली उडी , त्यासाठी लागणारे धैर्य अशा अनेक गोष्टी त्यांनी मुलांना आपल्या व्याख्यानातून सांगितल्या. उपस्थित सर्व मुलांनी व शिक्षकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेच्या शिक्षिका सौ. मनीषा ढवळीकर यांनी केले.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते श्री पार्थ बावस्कर, शाळेचे मुख्याध्यापक श्री नागेशकर सर व शांतादुर्गा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष देसाई उपस्थित होते.
प्रमुख वक्ते पार्थ बावसकर यांची ओळख चतुरंग कार्यकर्ते श्री अभय प्रभू यांनी केली , तसेच आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ. जोशी यांनी केले.