म्रुत्यूंजयी लढवय्ये सावरकर

स्वातंत्र्याचे पूर्वरंग कार्यक्रम दि 15/8/24रोजी सायंकाळी सहा वा.ब्राह्मण सहायक संघ येथे आयोजित केला होता .प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता.श्री.पार्थ बावस्कर यांनी' म्रुत्यूंजयी लढवय्ये सावरकर' या विषयावर आपले विचार मांडले. त्यांचे स्वागत प्रा.मिनल ओक यांच्या शुभहस्ते केले.सावरकरांच्या मुलाच्या निधनानंतर ,त्यांनी सागरा प्राण तळमळला हे काव्य लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ते बावस्कर यांनी सविस्तर पणे सांगून कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.स्नेहल जोशी यांनी केले.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
गुरुवार, 15 ऑगस्ट 2024  06:00 PM
ठिकाण
ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृह : चिपळूण
पत्ता
ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृह : चिपळूण