चला, आता तुमची पाळी

चतुरंग प्रतिष्ठान, पी. ई. एस. मराठी वाङ्मय मंडळ व आय. क्यू. ए. सी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवणानंद उपक्रमांतर्गत "चला, आता तुमची पाळी" या विषयावर दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अभिनेता-लेखक श्री. शरद पोंक्षे लाभले होते. कार्यक्रमाची सुरूवात शर्वी सरदेसाई हिने सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर रचित 'जयोस्तुते' या गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वक्ते श्री शरद पोंक्षे, पी. ई. एस महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीचे खजिनदार श्री. प्रकाश बाळवे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सतीश केळुसकर, चतुरंग प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ सदस्या दीपा मिरींगकर, मराठी विभागप्रमुख श्री. दीपक छत्रे उपस्थित होते. श्री. दीपक छत्रे यांनी स्वागतपर भाषण केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सतीश केळुसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दीपा मिरींगकर यांनी चतुरंग प्रतिष्ठानबद्दल माहिती दिली व श्री. शरद पोंक्षे यांचा परिचय करुन दिला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
गुरुवार, 24 ऑगस्ट 2023  11:30 AM
ठिकाण
पी. ई. एस. महाविद्यालय, फर्मागुडी-फोंडा
(महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी)
पत्ता