'चतुरंग' चा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा हर्षोल्लासात संपन्न

'चतुरंग प्रतिष्ठान 'च्या वतीने होणाऱ्या निवासी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक करणारा गौरव सोहळा चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे यांची उपस्थिती लाभली.तसेच यावेळी श्री.शरद शिंपी हे शिक्षण विषयक विचार मांडण्यासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावर्षी या सोहळ्यामध्ये ९२ ते १००% गुण मिळविलेल्या एकूण २२ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र,भेटवस्तू देऊन प्रथमेश लघाटे ,श्री.शरद शिंपी व श्री.ओंकार तांबे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे स्व.प्रतिभा मोने स्मृती प्रित्यर्थ दिली जाणारी शिष्यवृत्ती कु.हर्षदा संदीप पालकर आणि चि.ओंकार गणेश बैकर यांना तर स्व.चिंतामणी काणे तथा काणे मामा स्मृतिप्रित्यर्थ  शिष्यवृत्ती कु.सायली शिवाजी कळंबटे हिला प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने कु .कनिष्का बावधनकर,कु.हर्षदा पालकर ,कु.धनश्री पंडित व चि. अथर्व नानिवडेकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

चतुरंग अभ्यास वर्गातील शिक्षक प्रतिनिधी म्हणून संस्कृत चे शिक्षक  श्री.ओंकार तांबे उपस्थित होते. त्यांनी  चतुरंगच्या उत्तमाकडून सर्वोत्तमाकडे घेऊन जाण्याच्या ध्यासाचे कौतुक केले.

श्री.शरद शिंपी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात चाकोरीबद्ध शाखांशिवाय पर्यटन,सागरविज्ञान,हवामान,जैव विविधता अशा विविध अभ्यासक्रमांची निवड कोकणातील विद्यार्थ्यांनी जरूर करावी असे सूचित केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश टिकवण्यासाठी सातत्याने मेहनत करण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला प्रथमेश लघाटे यांनी सर्व गुणवंतांना दिला. कोकणातील अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत चतुरंगच्या निवासी वर्गाचा मोलाचा वाटा आहे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आणि प्रोत्साहन देणारा असा हा वर्ग आहे. असे मनोगत प्रथमेश ने व्यक्त केले.  

सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. उत्कर्षा प्रभुदेसाई हिने केले.प्रास्ताविक चि.ओंकार केतकर तर ऋणनिर्देश सौ.इंद्रायणी दीक्षित यांनी केले. ह्या सोहळ्याला चिपळूण परिसरातील पाग् हायस्कूल, परांजपे हायस्कूल, जवळचेच लवेल हायस्कूल येथील विद्यार्थी शिक्षण विषयक विचार ऐकण्यासाठी आणि चतुरंगचा गुणवंत गौरव सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 25 जून 2023  10:00 AM
ठिकाण
ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण
पत्ता