पूर्वतयारी अभ्यासवर्ग

कोकणखेडयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या शाळांतून, विविध अन्य संस्थांतून आणि चतुरंगतर्फेही अभ्यासवर्गांचे/शिबिरांचे आयोजन केले जात असे. परंतु हे सारे वर्ग शालेय वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत, साधारणपणे दिवाळीनंतर होत असत. पर्यायाने नेमके मार्गदर्शन लाभूनही विद्यार्थ्यांच्या हाती सुधारणा करण्यास वेळ अपुरा राहात असल्याचे लक्षात आले. हेच मार्गदर्शन शालेय वर्षाच्या सुरूवातीच्या काळातच लाभल्यास विद्यार्थ्यांसाठी ते अधिक हितकारक ठरेल, या विद्यार्थावर्गाच्या सूचनेनुसारच या पूर्वतयारी वर्गांच्या आयोजनाला प्रारंभ झाला. कोकणातील वहाळ, गुहागर, चिपळूण या तीन केंद्रांवर जून महिन्याच्या प्रारंभीच या पूर्वतयारी वर्गाचे आयोजन केले गेले.