चतुरंग प्रकाशने
विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करताना आयोजनाच्या त्या त्या टप्प्यावर त्या विषयाच्या पाऊलखुणा मागे राहाव्यात, संस्था म्हणून त्या विषयाचे काही documentation व्हावे, म्हणून वेळोवेळी विशेष पद्धतीचे पुस्तकरूपी संकलन करण्यात येते. त्यामध्ये, पुस्तक, कविता संग्रह, एकांकिका संग्रह, कॅसेट, मानपत्र संग्रह, गौरवग्रंथ, स्मरणिका इ. प्रकारचे प्रकाशन करण्यात आले आहे. बहुतेक वेळा रसिकांना ते विनामूल्य पद्धतीने अथवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याचा आनंद चतुरंगने घेतला आहे.