मुलाखत : श्री. विष्णु शिरोडकर

चतुरंग प्रतिष्ठान गोवा केंद्र आयोजित मुक्तसंध्या या कार्यक्रमात गोव्यातील प्रसिद्ध सिंथसाइजर कलाकार 
श्री. विष्णु शिरोडकर यां मुलाखतीचा कार्यक्रम शनिवार, दिनांक 3 ऑगस्ट 2024 विश्वहिंदू परिषद सभागृह, खडपाबांध, फोंडा- गोवा येथे पार पडला,  श्री विष्णू शिरोडकर यांनी सिंथेसायझर वादनासह आपला  कलाप्रवास व त्या क्षेत्रातील अनुभव आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत प्रस्तुत केले. कुठलही शास्त्रीय शिक्षण न घेता सुरुवातीच्या काळात फक्त रेडिओ आणि नंतर कॅसेट ऐकून त्यांनी वेगवेगळी गाणी तसेच म्युझिक पीस तयार केले. सुरुवातीच्या काळात फक्त आवड किंवा छंद म्हणून आपले शिक्षण व नंतर नोकरी सांभाळत त्यांनी अनेक ऑर्केस्ट्रा संगीत कार्यक्रम संगीत स्पर्धा यामध्ये सिंथेसायझर वादनाची साथ संगत केली व नंतर नोकरी सोडून पूर्णवेळ त्यांनी या क्षेत्रात झोकुन दिले. आपले वडील व रेडिओ यांना ते आपले पहिले गुरू मानतात. 
त्यांनी आपल्या सिंथेसायझरची साथ अनेक मोठ्या कलाकारांना केलेली आहे तसेच आतापर्यंत जवळपास 5000 कार्यक्रमाना त्यांनी साथ संगत केलेली आहे.
या कार्यक्रमासाठी  गोव्यातील नामवंत निवेदक व सूत्रसंचालक श्री. गोविंद भगत संवादक म्हणून  लाभले होते. त्यांनी आपल्या विशेष शैलीत  मुलाखत घेत  या कार्यक्रमाला बहर आणला.
या कार्यक्रमाला तबल्यावर श्री. शशांक उपाध्ये यांची साथ संगत लाभली व गायनासाठी श्री. मनोज देसाई यांची साथ लाभली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुरंग कार्यकर्ते श्री श्रीकृष्ण देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अभय प्रभू यांनी केले.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 03 ऑगस्ट 2024  05:30 PM
ठिकाण
विश्वहिंदू परिषद सभागृह, खडपाबांध, फोंडा- गोवा
पत्ता