'हा खेळ शब्द सुरांचा...'

रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या सभागृहात चतुरंगच्या मुक्तसंध्या कार्यक्रमात 'हा खेळ शब्द सुरांचा...' ही गायन मैफल श्री. राजाभाऊ  शेंबेकर यांनी सादर केली. मंगलाचरणानंतर "जेथूनी उद्गार   प्रसवे ओंकार" या गाण्याने मैफिलीची सुरूवात केली. ही गुरुप्रती व्यक्त  केलेली कृतज्ञता,आषाढीच्या  पहिल्या दिवशी" अवचित दिसशी मला म्हणूनिया मेघा तुला" हे गीत सादर करताना त्यांनी जितेंद्र  अभिषेकी बुवांच्या आठवणीही सांगितल्या. अभिषेकी बुवांनी प्रतिमा आणि प्रतिभा या कार्यक्रमात हे गीत सादर केले होते. महाकवि कालिदास  आणि अभिषेकी बुवा यांचे स्मरण  या प्रसंगी सर्व श्रोत्यांना झाले.


भीम व पलास हे दोन वेगळे राग पण इतके सारखे की वेगळं दाखवणं  कठीण जायचं म्हणून भीमपलास हे  नांव रुढ झालं. प्रेम वरदान, स्वकुल तारकसुता,पंढरीचे सुख नाही  त्रिभुवनीं, अनंता तुला कोण पाहू शके रे, देवाघरचे ज्ञात कुणाला, दिवे लागले रे अशी एकापेक्षा एक सरस गाणी माहिती सांगत सादर केली. त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी रंगत आली. दर्दी, रसिक श्रोत्यांनी  शेवटपर्यंत कार्यक्रमाचा मनसोक्तपणे  आस्वाद घेतला. सूत्रसंचालन सौ. विद्या टेंगसे यांनी केले.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 16 जुलै 2023  05:30 PM
ठिकाण
विद्याप्रसारक मंडळ, गोवा
पत्ता