"घरच्या संस्कार आणि शिकवणुकीचा जीवनावर प्रभाव"

घरातील भजन परंपरा ही जशी माझ्या गाण्यासाठी सुरुवात ठरली तसेच घरातून झालेले संस्कार आणि शिकवण  यांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव माझ्या आजवरच्या प्रवासात आहे. अशी प्रांजळ कबुली कोकणगंधर्व प्रथमेश लघाटे ने दिली. चिपळूण येथील चतुरंग च्या मुक्तसंध्या उपक्रमात प्रथमेश लघाटे ची मुलाखत रंगली होती. चिपळूण येथील संवादिका सौ.मीराताई पोतदार यांनी प्रथमेश ला रंगतदार मुलाखतीतून बोलते केले.

सुरुवातीला चिपळूण येथील सतीश कुंटे आणि वीणा कुंटे यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर पुढच्या प्रवासात अनेक ज्येष्ठ गायक गुरू म्हणून लाभले. त्यांनी सुद्धा गायक म्हणून घडण्यास खूप मदत केली. असे प्रथमेश ने सांगितले. दोन वेगळी घराणी शिकताना त्यातील सूक्ष्म फरक कसा असतो हे ही त्याने स्पष्ट करून सांगितलं. पुढे बोलताना प्रथमेश सारेगमप विषयी भरभरून बोलला. लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर, किशोरी ताई यांसारख्या दिग्गजांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांचे आशीर्वाद घेता आले.तेव्हाच रोहित, आर्या, मुग्धा, कार्तिकी सारखे खूप छान मित्र मिळाल्याचे सांगितले. नुकत्याच झालेल्या सारेगमपच्या नवीन पर्वातील परीक्षकाच्या भूमिकेविषयी सुद्धा तो व्यक्त झाला. "आम्ही त्या मंचावर स्पर्धक म्हणून वावरलो होतो त्यामुळे आताच्या सपर्धकाना मेंटोरिंग ही छान करता आले त्याचे वेगळे समाधान होते" .

मीराताईंनी ह्या मुलाखतीतून प्रथमेश चा आजवरचा सगळ्यात सुखद अनुभव असलेला उस्ताद झाकीर हुसेन जींच्या भेटीचा अनुभव उलगडून घेतला. खर तर मला भेटून निव्वळ त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता पण प्रत्यक्षात मात्र त्यांना साथ करण्याची संधी मिळाली आणि माझे भानच हरपून गेले असे प्रथमेश म्हणाला.

मुलाखतीत पुढे काही इंटरेस्टिंग प्रश्न विचारून मीराताईंनी गप्पांमध्ये अजून रंगत आणली. गायक झाला नसतास तर काय झालं असतास ? अशा प्रश्नाला उत्तर देताना मी शेफ झालो असतो....मला जेवण करायला खूप आवडते असे प्रथमेश ने आवर्जून सांगितले. गा अजून काय आवडतं...यावर उत्तर देताना प्रथमेश म्हणाला की, तबला वाजवायला खूप आवडतो....शास्त्रशुद्ध तबला शिकायची मनापासून इच्छा आहे आणि  उत्तम उर्दू सुद्धा शिकायचे आहे.

मुलाखतीच्या उत्तरार्धात सगळ्या प्रेक्षकांची उत्सुकता असलेला प्रथमेश मुग्धा यांच्या प्रेमाच्या प्रवासाविषयी प्रश्नांना प्रथमेश ने निसंकोच पणे उत्तरे दिली. एकमेकांच्या मनात प्रेमाचा विचार तर सुरूच होता फक्त मी पहिल्यांदा तिला विचारलं आणि मग दोघांनी एकाचवेळी घरच्यांना सांगितलं.अशी प्रेमाची कबुली प्रथमेश ने सर्वांसमोर दिली.

अशा वेगवेगळ्या अनुभवांनी, प्रसंगांनी, भरलेल्या ह्या मुलाखतीत प्रथमेश ने गाण्याची झलक दाखवली नसती तर नवलच वाटल असत. विशेष म्हणजे प्रथमेश ने गप्पांच्या ओघात सुंदरशी गझल सुद्धा सादर केली...जयपूर घराण आणि किराणा घराण ह्या दोन वेगवेगळ्या घराण्यातील गुरूंकडून आलेला अनुभव,  राग गाऊन सगळ्यांना समजावून सांगितला. मुलाखतीचा शेवट भैरवी ने केला. सुमारे दीड - एकशे चिपळूणकर रसिकांनी ह्या मुलाखतीचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 25 जून 2023  06:00 PM
ठिकाण
ब्राह्मण सहायक्क संघ सभागृह, चिपळूण
पत्ता