वैज्ञानिक प्रगतीच्या काळातील जीवनशैली अधिकाधिक गतीमान् बनत असताना ‘भरपूर वाचणे’, ‘खूप काही ऐकणे’ आणि ‘अधिकाधिक विचार करणे’ या गोष्टी मात्र समाजात विसरत चालल्या आहेत, असे वास्तव प्रतिपादन, अनेकानेक मान्यवरांकडून विविध प्रसंगी केले जाताना आढळते. या म्हणण्यावर कांही कृतीशील, ठोस पाऊल म्हणून वैविध्यपूर्ण-विचारगर्भ व्याख्यानमालेचा विचार चतुरंग मनात आकार घेऊ लागला आणि महाराष्ट्रातल्या नामवंत व्याख्यात्यांच्या, भिन्न भिन्न विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन सुरु झाले. रंजनपर कार्यक्रमांच्या जोडीने प्रबोधनपर आणि समजोपयोगी विषयांचीही उचित दखल चतुरंगच्या पाचही केंद्रांवर सातत्याने घेतली जावी, हा स्पष्ट उद्देश नव्या उपक्रमामागे राहिला. समयोचित अशा एकाच विषयावर, विषयसत्राला धरून एकाच व्यक्तीची सलग दोन-तीन व्याख्याने किंवा एकाच मुद्द्याला/विषयाला केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या दोन-तीन व्याख्यात्यांची दोन-तीन व्याख्याने, असे या उपक्रमाचे स्वरूप ठरले. ज्यातून उत्सुक श्रोतृवर्गाला अभिरुचीसंपन्न विषयांची आणि व्याख्यानांची चतुरंगमंचावरून सलग अशी मेजवानी लाभायला सुरुवात झाली.
आगामी कार्यक्रम
सध्या उपलब्ध नाहीत.
अहवाल
गुणवंत गौरव सोहळा
चतुरंग रंगसंमेलन
चतुरंग वर्धापनदिन
चैत्रपालवी संगीतोत्सव
दिवाळी पहाट
निवासी वर्ग निकाल
पालक मेळावा
पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ
मुक्तसंध्या
विशेष उपक्रम
शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
श्रवणानंद
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
सवाई एकांकिका
सवाई एकांकिकोत्सव
स्वातंत्र्याचे पूर्वरंग
प्रशस्तिपत्रे

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.