स्व. विद्याधर गोखले यांच्या स्मृतींचा पट.. तीन पिढ्या

साहित्यशारदेच्या प्रांगणातील साक्षात् गौरीशंकर, नामवंत पत्रकार-संपादक, मर्मज्ञ कवि, संस्कृत आणि उर्दू या दोन्ही भाषांचे उत्तम जाणकार आणि रसग्राही, अत्युच्च प्रतिभेचे नाटककार श्रोतृवर्गसंमोहनकुशल वक्ता, या आणि अशा अनेकानेक गुणविशेषांसोबतच असलेला एक आदर्श कुटुंबवत्सल खाद्यप्रेमी गृहस्थ असे महाराष्ट्रगौरव विद्याधर अण्णा गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांच्या तीन पिढ्यांशी चतुरंग ने मुक्तसंध्या कार्यक्रमात साधलेल्या सुसंवादातून, उपस्थित रसिकांसमोर उलगडत गेले, ब्राह्मण सहाय्यक संघाच्या आश्वासक आणि प्रेरक साथीमुळे श्रोत्यांना एका उत्तम अनुभवाचा लाभ झाला
मराठी जनांना अण्णांबद्दल वाटणारा प्रेमयुक्त आदर पुढच्या पिढ्यांच्याही वाट्याला येत असल्याचे श्रोत्यांकडून समेवर मिळणारी योग्य दाद दर्शवत होती, अर्थात् गोखले आणि दादरकर कुटुंबियांच्या स्वकर्तृत्वाचाही त्यात वाटा होताच !!
अण्णांच्या काव्यप्रतिभेला जीवनाच्या अपराह्नकाली झालेला परतत्व स्पर्शु, त्यांची परमशिवावरील भक्ति, नादमयी सुरनदी गंगेच्या दर्शनाने उचम्बळून येणाऱ्या लहरी या सर्वांची अनुभूति श्रोत्यांना देत संपन्न झालेला हा कार्यक्रम शेवटी, अण्णांच्या हृदयस्थ स्मृतींनी भारावलेल्या उपस्थितांचे डोळे ओले करून गेला !!

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?July 20, 2019
6.00 PM
ठिकाणब्राह्मण सहाय्यक संघ, शिवाजी पार्क, दादर
पत्ताब्राह्मण सहाय्यक संघ, शिवाजी पार्क, दादर

फोटो गॅलरी