सवाई एकांकिकोत्सव

चतुरंगच्या नियमित मुंबईत २५-२६ जानेवारीला होणार्या ‘ सवाई एकांकिका स्पर्धां ‘ चा छोटेखानी थरार का होईना पुणेकरांना अनुभवता यावा या उद्देशाने नव्याने सुरू झालेल्या ‘ सवाई एकांकिकोत्सव ‘ या कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष.
सर्व प्रतिस्पर्धी एकांकिकांतून निवडलेल्या तीन ‘ सवाई एकांकिका ‘ पुणेकरांना अनुभवता आल्या. ‘पाझर’, ‘३०० मिसींग’, ‘ इन् सर्च ऑफ ‘ या तीनही एकांकिकांना नाट्यरसिक पुणेकरांनी प्रेमाने दाद दिली.
या तीनही एकांकिका चतुरंगप्रेमी रसिकांनी पुण्यात भरतनाट्यमंदिर येथे अनुभवल्या.
‘चतुरंग’ च्या या सोहळ्याला काहीवर्षांपूर्वी ‘सवाई’ ठरलेले आणि सद्ध्याही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ‘सवाई’पणेच वावर करणारे श्री. योगेश सोमण , श्री.दिग्पाल लांजेकर , कु.तन्वी कुलकर्णी, श्री. आलोक राजवाडे, श्री. अजिंक्य गोखले , सौ. अश्विनी निमकर-मुकादम
इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांनीही ‘सवाई’ स्पर्धकांचे विशेष कौतुक केले. आणि काही आठवणीही सांगितल्या.
कार्यक्रम ‘चतुरंग’ च्या परंपरेप्रमाणेच वेळेत सुरू झाला आणि प्रेक्षकांच्या व मान्यवरांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने आणि त्यांनी स्पर्धकांवर केलेल्या कौतुकाच्या वर्षावाने त्याची सांगता झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?February 4, 2017
7.00 PM
ठिकाणभरतनाट्यमंदिर , पुणे
पत्ताभरतनाट्यमंदिर , पुणे
प्रमुख पाहुणेश्री. योगेश सोमण , श्री.दिग्पाल लांजेकर , कु.तन्वी कुलकर्णी, श्री. आलोक राजवाडे, श्री. अजिंक्य गोखले , सौ. अश्विनी निमकर-मुकादम

फोटो गॅलरी