पुणे – सुनील बर्वे

चतुरंगची ‘सु.ब.क.’ संध्याकाळ..
बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ‘नावांत काय असतं?’ पण नावांत काय ताकद असते ह्याची प्रचिती आज पुणेकर रसिकांनी चतुरंगच्या ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ ‘ह्या अनेकविध विषयांवरील गपांच्या मैफिलित घेतली. ‘सु.ब.क.’अर्थात ‘सुनील बर्वे कलाकृती’ (आहे की नाही ‘नावाची’ मजा..) आज चतुरंगच्या व्यासपीठावर सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि आता निर्माता म्हणून मराठी-नाट्यसृष्टी ,सिनेसृष्टी आणि टेलिविज़न ह्या तिनही प्रकारात ज्यानी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय; अशा हरहुन्नरी कलाकार सुनील बर्वे यांनी चतुरंग आणि पुणेकर रसिकांची आजची संध्याकाळ खऱ्या अर्थानं ‘सु ब क’ केली.
रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनील दादानं तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं दिली.तुमचा आवडता दिग्दर्शक कोण?,वेगवेगळ्या नाटकांमधील प्रयोगादरम्यांनचे अनुभव, गमती-जमती, सध्याच्या नवोदित कलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभव, नाटक-निर्मिती करताना समोर असणारी आव्हानं ,पाच मराठी नाट्य-दिग्दर्शकांसमवेत स्वखर्चाने लंडनमधील नाट्य-चळवळीचा अभ्यास करण्यासाठी केलेला लंडन-दौरा,अशा अनेकविध अंगांनी सुनील दादाचं खरंखुरं ‘हरहुन्नरीपण’रसिकांना अनुभवता आलं.
कार्यक्रमादरम्यान चतुरंग प्रतिष्ठान द्वारा गेली सुमारे २६ वर्षे दिल्या गेलेल्या ‘जीवनगौरव पुरस्कार’ सोहळा अर्थात ‘रंगसंमेलनाची’ चित्रफ़ित दाखविली गेली. ह्यावर्षिचा जीवनगौरव पुरस्कार मूर्तिशास्त्र आणि मंदीर स्थापत्य-शास्त्राचे गाढे अभ्यासक श्री. गो. बं.देगलूरकर सर यांना जाहीर झाला आहे; आणि ह्यवर्षिचं रंगसंमेलन पुण्यातील गणेश कला क्रीड़ा रंगमंदिरात दि.१६ आणि १७ डिसेम्बर २०१७ रोजी सायं.४ ते १० ह्या दरम्यान संपन्न होणार आहे..

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?November 26, 2017
4.00 PM
ठिकाणशैलेश सभागृह,पुणे
पत्ताशैलेश सभागृह,पुणे
प्रमुख पाहुणेसुनील बर्वे

फोटो गॅलरी