डॉ. आशुतोष जावडेकर यांच्यासोबत सुरेल गप्पा..!

चतुरंग प्रतिष्ठान, पुणे आयोजित 'मुक्तसंध्या' हा  कार्यक्रम रसिकांना एक सुरेल मेजवनी देणारा ठरला.


सुप्रसिद्ध गायक,लेखक,संगीतकार, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांच्याशी संवाद साधला FTII च्या टेलिव्हिजन विभागाचे दिग्दर्शन-प्रमुख श्री.मिलिंद दामले यांनी. दन्तवैद्य ते कलाकर ह्या प्रवासातील टप्पे उलगडतना  डॉ. जावडेकर  म्हणाले  अभ्यास महत्वाचाच पण प्रत्येक भूमिकेतील भावनिक गुंतवणूक जास्त मोलाची. I am a creator ; सर्जनशीलता ही कलाकराला जिवंत ठेवत असते; संगीताचे लोकशाहीकरण झाले पाहिजे ; लयपश्चिमा, नवे सुर नवे तराणे या पुस्तकांच्या निर्मितीप्रक्रीयेविषयी सांगताना ते  म्हणाले पाश्चात्य संगीताला त्याज्ज लेखू नका;पारंपारिक संगीताइतकच ते ही छान आहे.

मुळारंभ कादंबरी विषयी सांगताना ' चिन्हभाषा हि आजाच्या पिढीची भाषा आहे'  असे ते म्हणाले.

समीक्षण हे फ़क्त नाटक कविता कादंबरी चे  नाही तर सगळ्या लेखन प्र्कारांचे झाले पाहिजे असे आशुतोषजींना वाटते.
आजवरच्या ह्या प्रवासात घराच्य्यांचा पाठींबा कायमच होता त्यामुळेच नवनवीन काही उमेदिने करू शकलो असेही ते म्हणाले.'लावणी ते रॉक' आणि 'अभंग ते फोक' असा मोठा सांगीतिक पटआशुतोषजींनी आपल्या खास संवादशैलीत रसिकांसमोर उलगडून दाखवला."मुंबाईच्या मनकर्णिके" ह्या लावणिला टाळ्या आणि शिट्यांची दाद मिळाली तर  'गारवा','गॅस कनेक्शन' इ .सादरीकरणांना रसिकांनी वन्स मोअर दिला.श्री.पराग जोशी ह्यांनी आपल्या  गिटार वादनाने त्यांना साथ कॆली. वीण या प्रसिद्ध आल्बम च्या रेकॉर्डिंग च्या वेळचे किस्से हि त्यांनी सांगितले.'विशि तिशि चाळिशी' ह्या सदर-लेखनातील काही प्रसंगांचे अभिवाचन श्री दामले आणि आशुतोष जींनी केले आणि मैफिलित अधिकंच रंग भरले. 
स्वतः आशुतोष जींनी संगीतबद्ध केलेल्या तुकाराम महाराजांच्या'निर्धार' ह्या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली.  

        कार्यक्रमाला म.सा.प.चे श्री. मिलिंद जोशी सर,ज्येष्ठ रंगकर्मी श्रीम.निर्मलाताई गोगटे, जड़ण-घड़ण मासिकाचे संपादक श्री.डॉ. सागर देशपांडे,पुना गेस्ट हाउसचे श्री.किशोरदादा सरपोतदार  कोकण रेल्वे चे चिफ़ इजिनॆयर श्री केतन गोखले इ मान्यवर उपस्थित होते..

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
गुरुवार, 20 एप्रिल 2023  05:00 PM
ठिकाण
पत्रकार भवन, पुणे.
पत्ता
पत्रकार भवन, गांजवे चौकाजवळ, नवी पेठ, पुणे.