मुखवट्यांमागचे मन

१९९८ ला "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाने सुरू झालेला एक प्रवास पुढे जीवनाचं कायापालट करणारा ठरला. अगोदरच्या 14 नाटकांमध्ये अगदी नगण्य अशा भूमिकेत असलेल्या या नटाच एका नाटकाने नशीब पालटलं. ते अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. मागील 20 वर्षात या नाटकाचे 1000 प्रयोग झाले. त्यातले 80 % प्रयोगांमध्ये नाटक उभ राहण्यासाठी संघर्ष झाला. कुणी तिकीट विक्री बंद पाडली तर कुणी नाटक चालू असताना अंगावर शाई फेकली. तरीही तटस्थ पणे उभे राहून सर्व प्रयोग यशस्वी रित्या पार पाडले गेले. आता या नाटकातील त्यांच्या भूमिकेचा शेवट होत आहे. तरीही या 20वर्षाच्या प्रवासाच्या गोष्टी आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी पडद्यामागची भूमिका रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळाली ती चतुरंग रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाच्या संयुक्त  विद्यमाने   प्रस्तुत  'मुक्तसंध्या' या कार्यक्रमात 
           कार्यक्रमाचा विषय होता "मुखवट्यामागचे मन" आणि कलाकार : श्री. शरद पोंक्षे. एका बहुचर्चित नाटकाचे म्हणजे "हे राम नथुराम" या नाटकाचे शेवटचे १० प्रयोग होणार असे कळले. त्यातले २ प्रयोग रत्नागिरीत ४ मार्चला आहेत हे कळल्यावर चतुरंगने हे निमित्त साधले व त्यांची मुलाखत आयोजित केली. ही मुलाखत त्यांचेच चांगले मित्र श्री. विवेक जोशी यांनी घेतली त्यामुळे या मुलाखतीला औपचारीक स्वरूप न येता मनमोकळ्या गप्पांचे स्वरूप आले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुलाखतीत शरदजींनी त्यांचे अनेक मौलिक अनुभव सांगितले. प्रत्येक मालिकेतील वेगवेगळी भूमीका आणि त्यासाठी घेतलेले कष्ट त्यांनी खूप छान उलगडले. आपल्याला डोळ्यांना दिसतांना पूर्ण मालिका खूप छान दिसत असली तरी त्या मागे किती बारीक बारीक गोष्टी असतात हे त्यातून स्पष्ट झाले. त्यांचे बहुचर्चित नाटक " हे राम नथुराम " करतांना त्यांना किती संकटांना सामोरे जावे लागले आणि तरीही त्यांनी एकही प्रयोग पडू न देता जिद्दीने कसा पूर्ण केला हे वर्णन ऐकतांना श्रोत्यांच्या अंगावर काटा आला.
          हे सगळं सांगत असतांनाच ते ज्येष्ठ कलाकारांकडून काय काय चांगलं शिकले आणि त्याचा किती उपयोग झाला याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. दिग्दर्शकाच्या सूचनांबरोबरच स्वत:च्या प्रतीभेने भूमीेकेत जीव ओतून ती प्रत्ययकारी करणा-या या कलावंताचे मनोगत सर्वांनाच भिडले. अशा प्रकारे, त्या दोघांनीही प्रेक्षकांच्या प्रश्नांना देखिल उत्तरे देत या 'गप्पा'रूपी मुलाखतीची सांगता केली.
       या कार्यक्रमाला रत्नागिरीचे आमदार मा. श्री. उदयजी सामंत , नगराध्यक्ष मा. श्री. राहूल पंडीत, पत्रकार आणि नाट्यप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शुक्रवार, 14 एप्रिल 2023  06:00 PM
ठिकाण
स्वयंवर मंगल कार्यालय , माळ नाका, रत्नागिरी
पत्ता
स्वयंवर मंगल कार्यालय , माळ नाका, रत्नागिरी