नामदेवांची अमृतवाणी

‘नाम’ हाच आपल्या आयुष्याचा एकमेव ‘वेद’ ज्यांनी मानला आणि जगला,आणि ‘अमृताहूनि गोड नाम तुझे देवा’ असं म्हणंत ज्ञानाला ‘भक्तिची’ जोड दिल्यास ‘परमात्मापर्यंत’ पोहोचता येतं, नव्हे-नव्हे त्याची ‘अनुभूती’ देखील घेता येते, हा विश्वास रंजलेल्या-गांजलेल्यापासून समाजातील धनिक वर्गपर्यंत सर्वांमध्ये निर्माण करणारे, ‘भागवत-धर्माच्या’ इमारतीला भक्कम अध्यात्मिक पाया देणारे, संत शिरोमणी अर्थात नामदेव महाराज..
चतुरंग प्रतिष्ठान आयोजित ‘श्रवणानंद’ ह्या अनेकविध विषयांवरील भाषाणांच्या ‘शब्दसोहळयात’ रवि. दि.२४ सप्टें.२०१७ रोजी अभ्यासु वक्त्या सौ. धनश्री लेले यांनी नामदेव महाराजांची साहित्य तसेच ‘अभंग-संपदा’,त्यांचं अखिल मनुष्यजातीच्या सर्वांगीण उद्धाराचं कार्य, आपल्या तितक्याच रसाळ आणि अमृतरूपी वाणितुन पुणेकर श्रोत्यांना उलगडून दखवलं. आजपासून सुमारे आठशे वर्षापूर्वी ‘सोवळया-ओवळयात’च जखडल्या गेलेल्या ईश्वराला सर्वसामान्य बहुजनांपर्यंत पोचवन्याचा ‘चमत्कारंचं’ नामदेव महाराजांनी केला. ज्ञानाबरोबरच ‘भक्तिमार्गाचं’ असणारं महत्व नामदेव महाराजांनी आपल्या सुमारे दोन ते अडीच हजार अभंगांमधुन पटवून दिलं.
इतकं सारं करूनही आम्ही केवळ ‘पायरीचे चिरे’ हे म्हणणयाचा वृत्तीच्या ‘विनम्रपणा’चा आदर्श देखील नामदेव महाराज आपल्या लेखणीतुन घालून देतात..

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?September 24, 2017
6.00 PM
ठिकाणउद्यान सभागृह , सदाशिव पेठ , पुणे
पत्ताउद्यान सभागृह , सदाशिव पेठ , पुणे
प्रमुख पाहुणेसौ.धनश्री लेले

फोटो गॅलरी