रसिकमान्य आणि कलावंतप्रिय ठरलेल्या `एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमापाठोपाठ, त्याचीच वेगळी आवृत्ती असलेल्या `रांगोळी’ आणि `निमित्तसंध्या’ याही उपक्रमांना महोत्सवी स्वरूपात निरोप देऊन झाल्यावर, रसिक-कलाकारांतील सहवास-संवादाची ओढ संपली नसल्याचे जाणवल्याने आणि प्रतिमासी `एका सुखद संध्याकाळ’चा वसा सुरूच ठेवायचा असल्याने निमित्तसंध्याच्या आगळ्यावेगळ्या समारोपानंतर `मुक्तसंध्या’ या उपक्रमाचे आयोजन सुरू झाले. एकच विषयसूत्र, एखादीच तज्ज्ञ व्यक्ती, तत्कालीन निमित्त अशा कुठल्याही बंधनात नसलेली संध्याकाळ ती `मुक्तसंध्या’! चतुरंग केंद्र असलेल्या गिरगाव, डोंबिवली, चिपळूण, गोवा या सर्व ठिकाणी या `मुक्तसंध्यां’चे आयोजन करण्यात येते आहे. सांस्कृतिक व्रतासारखा १९८४ पासून सुमारे ३० वर्षे अव्याहतपणे सुरू असलेला, पण नांव आणि स्वरूप बदलत जाणारा हा कलाकारप्रिय-लोकमान्य उपक्रम चतुरंगद्वारा आजही विनामूल्य प्रवेशतत्वावर सातत्याने आयोजित करता येतो आहे, याचा प्रतिष्ठानला सार्थ अभिमान वाटतो आहे.
आगामी कार्यक्रम
अहवाल
गुणवंत गौरव सोहळा
चतुरंग रंगसंमेलन
चतुरंग वर्धापनदिन
चैत्रपालवी संगीतोत्सव
दिवाळी पहाट
निवासी वर्ग निकाल
पालक मेळावा
पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ
मुक्तसंध्या
विशेष उपक्रम
शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
श्रवणानंद
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
सवाई एकांकिकोत्सव
स्वातंत्र्याचे पूर्वरंग
प्रशस्तिपत्रे

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.