कालिदासाचे मेघदूत

श्रवणानंद या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प अर्थात ,’कालिदासाचे मेघदूत ‘. जेष्ठ गायिका आणि बदलापूर रहिवासी सुमन माटे यांच्या हस्ते धनाश्रीजींचे स्वागत करण्यात आले .
कार्यक्रमाला सुरुवात करतानाच धनश्रीजी म्हणाल्या कि, ‘रामदास आणि कालिदास ‘ हे दोघेही श्रोत्यांना अगदी वेगळ्या पद्धतीने भिडतात. पण दोघांची शिकवण हेच सांगते, कि “दास “झाल्याशिवाय म्हणजे झुकल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही.
यक्षाला मिळलेला शाप ,त्यामुळे झालेला पत्नी-वियोग आणि मेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे केलेली पाठवणी , या एवढ्या कथेवर कालिदासाने लिहिलेले काव्य हे खरंच महान ठरतं. मेघाला मार्ग सांगतानाचे वर्णन ,त्याचे दाखले ,त्यातील भूगोल या साऱ्याचे अभ्यासपूर्ण असे वर्णन कथन करताना ,कालिदास आणि मेघदूत ,प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरल्या ,प्रेक्षकही उत्स्फूर्त दाद देत होते . शब्दरूपी मेघदूत बरसताना बाहेर खरोखरीच मेघ कोसळू लागला व कार्यक्रमाला आणखी रंगत आली. कालिदासाने यक्षाच्या नगरीपर्यंतचे केलेले प्रवासवर्णन धनश्रीजींकडून ऐकताना सारे समोर उभे राहत होते. यक्षाच्या पत्नीचे वर्णनही तितकेच सुंदर खुलवले.
दोन्ही दिवस बदलापूरकरांची उपस्थिती आणि प्रतिसाद उत्तम होता

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?September 18, 2016
6.30 PM
ठिकाणकाटदरे सभागृह , बदलापूर (पूर्व)
पत्ताकाटदरे सभागृह , बदलापूर (पूर्व)
प्रमुख पाहुणेसौ. धनश्री लेले

फोटो गॅलरी