राष्ट्रदेव लोकमान्य

एक शिस्तप्रिय, बाणेदार आणि स्वाभिमानी विद्यार्थी, गणिततज्ञ,कायदेपंडीत, निर्भीड आणि हजरजबाबी पत्रकार,फर्डा वक्ता,स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक,’एतदेशीय’,’नोकरशाही’ यांसारख्या असंख्य शब्दांनी मराठी-शब्दसंपदा अधिक वृधिंगत करणारा एक भाषातज्ञ,’Splitting of Face value’ ही संकल्पना सुमारे 100 वर्षांपूर्वी मांडणारा एक अभ्यासू अर्थतज्ञ,समाजाची नाडी ओळखलेला विश्वासु आणि विश्वस्त पुढारी,एक Defence strategist आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास by nature,he is a scholar & by necesity, he was a politician असा योद्धा राजकारणी, म्हणजे लोकमान्य टिळक; लोकमान्यांचे असे अनेकविध परंतु काहीसे अपरिचीत पैलुंवर श्री.चंद्रशेखरजी टिळक यांनी आपल्या ओघवत्या आणि संयमी वक्तृत्वशैलीने प्रकाश टाकला.
निमित्त होतं चतुरंग प्रतिष्ठान,पुणे आयोजित ‘श्रवणानंद’ या कार्यक्रमाचं. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारंच’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’, यांसारख्या अग्रलेखांमधून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारे लोकमान्य,’होमरूल लीगच्या’ माध्यमातून सम्पूर्ण स्वराज्याची मागणी प्रथमच करणारे लोकमान्य, ‘जुने आधार’व ‘नवे संस्कार’ यांची घट्ट वीण असणाऱ्या शिवजयंती, गणेशोत्सव यांना सार्वजनिक उत्सवांचं रूप देणारे लोकमान्य आणि राजकारणाला ‘धर्माचं’ अधिष्ठान जरूर असावं परंतु त्याला कोणत्याही धर्माचं ‘ आवरण’ असता कामा नये,हे परखडपणे मांडणारे त्यावेळच्या भारताचे अनभिषिक्त सम्राट असणारे लो.टिळक चंद्रशेखरजींनी अनेक उदाहरणांसहित श्रोत्यांसमोर उभे केले.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?September 25, 2016
6.00 PM
ठिकाणशैलेश सभागृह ,कर्वेनगर ,पुणे
पत्ताशैलेश सभागृह ,कर्वेनगर ,पुणे
प्रमुख पाहुणेश्री.चंद्रशेखर टिळक

फोटो गॅलरी