गुणवंत गौरव सोहळा २०१६

चतुरंग निवासी अभ्यासवर्ग आणि निर्धार निवासी अभ्यासवर्ग यांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि सोबतच एक कौटुंबिक संमेलन, २ जुलै २०१६ रोजी चिपळूण येथे पार पडले . दरवर्षी प्रमाणे प्रतिभा मोने आणि चिंतामणी काणे स्मृतीप्रित्यर्थ चतुरंग शिष्यवृत्तीही , निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून , कोमसाप चे विद्यमान अध्यक्ष आणि मुंबई आकाशवाणीवरील निर्माते कविवर्य डॉ. महेश केळुसकर उपस्थित होते.त्यांनी मेहनतीने पुढे जायचा सल्ला दिला ,तसेच परिस्थितीने घाबरून न जाता त्यावर मात करण्यास मार्गदर्शन केले.
सोबतच श्री. धनंजय चितळे व प्राध्यापक दीपक मराठे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.धनंजय चितळे यांनी वाचन या विषयावर आपले विवेचन केले , कसे वाचावे ,काय वाचावे , वाचन आपल्याला कसे समृद्ध करते याविषयी त्यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत संवाद साधला.

अभ्यासवर्गातील १० वी निकाल:
निवासी अभ्यास वर्गाचा निकाल १०० % असून, ५६ पैकी ४१ जण ९०% च्या पुढे आहेत.
नापासांच्या (प्रोमोटेड) निर्धार वर्गाचा निकाल हा ९७% आहे.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?July 2, 2016
9.00 AM
ठिकाणचिपळूण
पत्ताचिपळूण
प्रमुख पाहुणेडॉ . महेश केळुसकर, धनंजय चितळे व प्राध्यापक दीपक मराठे

फोटो गॅलरी