पं. वसंतराव देशपांडे : गायकीतला झंझावात!

वसंतराव देशपांडे हे गायकातील झझांवात होते. सुरांची फेक आणि सुरांशी लगाव ही त्यांची वेगळी शैली होती. चतुरंग मुक्तसंध्या उपक्रमातील मुलाखतीच्या कार्यक्रमात पं. वसंतराव देशपांडे यांचे शिष्योत्तम पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरूबद्दल भरभरून बोलले. चतुरंग डोंबिवली क्रेंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त आणि पं.वसंतराव देशपांडे यांच्याा जन्मशताब्दीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पं. चंद्रकांत लिमये यांनी बुवांच्या आठवणी आणि बंदिशी सादर करत हा कार्यक्रम सादर केला. मुलाखतकार होते ख्यातकीर्त निवेदक श्री सुधीर गाडगीळ!

ते सांगतात माझी व पंडीतजींची भेट ही घेई छंद मकरंद या गाण्याने झाली, तसं गाणं आपल्याला यायला हवं असं वाटलं. बुवा म्हणायचे माझे घराणे माझ्यापासून सुरू होते. गप्पांच्या ओघात पं लिमये यांनी ‘घागर मोरी भरन नही दे’ ही अडाणा रागातील बंदीश सादर केली. बुवा म्हणायचे तुमचा सूर स्थिर झाला की ताना आपोआप दाणेदार येतात. बुवांनी पं. अमनअलीखाॅं साहेबांकडून सरगम गायकी घेतली. सरगमला एक डिझाईन असते त्यातला पसारा बाजूला टाकून नेमके सौंदर्य ओळखणे हे बुवांचे वैशिष्ठ्य होते. हे सांगताना पं. लिमये यांनी ‘मै आऊ तोरे मंदरवा’ ही मधुवंती रागातील चीज गायली. वसंतरावांना आॅर्गन, तबला, सतार, दिलरूबा ही वाद्ये वाजवण्याची कला अवगत होती. त्यांचा स्वभाव मित्रत्वाचा होता. आपल्या कलेचा सर्वांना कसा उपयोग होईल ही भावना त्यांच्या मनात असे. ते उत्तम नकलाकार सुद्धा होते. सुरेशबाबु माने, पटवर्धन बुवा यांच्या ते हुबेहुब नकला करीत.
अखंड रियाजाने बुवांना सुरांची सिद्धी प्राप्त झाली होती.
उस्ताद असदअलींनी वसंतरावांना सहा महीने मारवा शिकवला. पं. कुमार गंर्धवांन बद्दल बोलताना वसंतराव म्हणाले होते, ” आम्ही सुपीक जमिनीत पीक काढते पण कुमार नापीक जमिनीत सुद्धा काढु शकतो. मुर्च्छना पद्धतीच्या गायकीचा त्यांचा अभ्यास होता.

एका रागातून क्षर्णाधात दुसर्या रागात जाऊ शकणे ही वसंतरावांची खासीयत होती. गप्पांच्या ओघात पं. लिमयेंनी ‘ विखरी प्रखर तेजोमय’ ही तिलककामोद रागातील बंदीश गायली. ‘सावरे अई जइयो ही ठुमरी सुद्धा त्यांनी गायली. नृत्यातील अदा करून दाखवणे सुद्धा वसंतरावांनी लिलया साधत असे. पं. लिमयेंनी आग्रहपुर्वक सांगितले की नाट्यसंगीत खर्या अर्थाने वसंतरावांनी त्यांना शिकवले. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांना नट बनविले. पं. लिमये सांगतात वसंतरावांकडून शिकलेल्या गायकीचा उपयोग मी विद्यादानात करतो. ताल डोक्यात ठेवून बंदीशीची धून बनवा म्हणजे त्याला अर्थ पैदा होतो ही वसंतरावांची शिकवण होती. गुरूऋणातून अंशत मुक्त होण्यासठी पं. लिमयेंनी कट्यारचे शंभर प्रयोग केले. चतुरंगच्या कार्यक्रमात सुधांशु घारपुरे (हार्मोनियम) आणि अतिल गोडसे (तबला) यांनी पं. लिमयेंना साथ दिली.
‘आज मै लढुंगा बुनियाद मे’ या भैरवी रागातील ठुमरीने पं. लिमयेंनी गप्पा-गाण्यांच्या मैफीलीची सांगता केली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?August 11, 2019
6.00 PM
ठिकाणसुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली (पूर्व)
पत्तासुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली (पूर्व)
प्रमुख पाहुणेपं . चंद्रकांत लिमये, श्री. सुधीर गाडगीळ.

फोटो गॅलरी