डोंबिवली – विष्णू मनोहर

डोंबिवलीकरांनी अनुभवली खमंग मेजवानी

चौदा विद्या चौसष्ट कलांनी संपूर्ण चतुरंग कार्यक्रमाची मेजवानी आम्ही रसिकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच परीपूर्ण मेजवानीचा आनंद डोंबिवलीकरांनी अनुभवला. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मेजवानी फेम विष्णु मनोहर यांचा एक कलाकार एक संध्याकाळ कार्यक्रम डोंबिवलीच्या सयोग मंगल कार्यालय मध्ये रंगला.

रसिकांची तुडूंब गर्दी आणि खमंग खुसखशीत प्रश्नांच्या वर्षावात संध्याकाळ पार पडली. रसिकांच्या विवीध अभ्यास पूर्ण प्रश्नांची विष्णुजींनी उत्सुकतेने उत्तरं दिली. वडील चिञकार आणि आई गायिका असल्याने कलेची आवड होतीच. पण अभिनेता, नट, गायक असं काहीतरी करावं वाटत होतं. परंतू आपण मूळातच मुखदुर्बल असल्याने आपल्याला ते फारसे जमले नाही असा खुलासा त्यांनी केला. 2003 मध्ये प्रथम ई टीव्ही वाहीनी सोबत 3 महीन्याचा करार झाला. त्यानंतर आता कलर्स वाहीनी पर्यंतच्या प्रवासाचा उलगडा त्यांनी केला. त्याच बरोबर अनेक अनुभव, गमतीदीर कीस्से त्यांनी सांगितले.

येत्या डिसेंबरला नव्या सिनेमासहीत ते चित्रपसृष्टीतही पर्दापण करणार आहेत. या चिञपटात ख्यातकीर्त अभिनेञी रोहीणी हट्टंगडी समवेत त्यांचा डबलरोल असणार आहे. या चिञपटाच्या प्रमोशनसाठी ते पुन्हा आपल्या भेटीला येणारेत असही म्हणाले. “कीतीही जग फिरलो तरी माझी आवड खूप साधी आहे. साधं वरण भात, भाजी, पोळी, तूप, मीठ, पापड, लोणचं ह्या साध्या जेवणात मला मनसोक्त आनंद मिळतो.” नटसम्राटचे स्वगत विविध पदार्थांच्या विडंबन स्वरूपात त्यांनी सादर केले. विष्णुजींच्या आत्या कार्यक्रमात उपस्थित होत्या, त्याच्याच हस्ते विष्णुजींना सन्मानचिन्ह देण्यात आले. रसिकांनी स्टँडींग ओवेशन देऊन संध्याकाळची सांगता झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?November 12, 2017
6.00 PM
ठिकाणसुयोग मंगल कार्यालय , डोंबिवली - पूर्व
पत्तासुयोग मंगल कार्यालय , डोंबिवली - पूर्व
प्रमुख पाहुणेख्यातकीर्त पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर

फोटो गॅलरी