दासबोधातील सौंदर्यस्थळे

चतुरंग प्रतिष्ठान कायमच आपल्या रसिकांना नवनवीन उपक्रमांचा आनंद देत आहे. त्यातीलच नवीन उपक्रम म्हणजे ‘श्रवणानंद ‘. विविध विषयांवरील श्रवणीय व्याख्यानांचा शब्दसोहळा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
दिनांक १७ आणि १८ सप्टें २०१६. रोजी हा कार्यक्रम बदलापूरच्या काटदरे हॉलमध्ये पार पडला. उत्तम निवेदिका आणि व्याख्यात्या सौ. धनश्री लेले यांची दोन वेगळ्या विषयावरची आणि व्यक्तींवरची अशी व्याख्याने ऐकण्याचा आनंद बदलापूरकरांना घेता आला.
पहिल्या दिवशी ‘दासबोधातील सौंदर्यस्थळे ‘ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.
दासबोध हा कुठल्याही प्रकारचा अनुवाद नसून समर्थांनी स्वत: आपल्या श्रोत्यांसाठी लिहिलेला ग्रंथ आहे,तसेच समर्थांची शिकवणूक ही इतर संतांपेक्षा निराळी होती, असे त्या समर्थांबद्दल बोलताना सांगत होत्या. उत्तम संसाराने परमार्थाची प्राप्ती होते, असे ते ठामपणे सांगतात. दासबोधात समर्थ अतिशय परखड आणि स्पष्टवक्तेपणाने श्रोत्यांना भिडले आहेत. समर्थांची ग्रंथसंपदा , मनाचे श्लोक जसे मानवी जीवन समृद्ध करतात तसेच ,शरीर, मन आणि आत्मा यांच्या शाश्वत सुखासाठीही ते महत्वाचे ठरतात . अगदी रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन धनश्रीजी अर्थपूर्ण शब्दात दासबोध उलगडत होत्या व श्रोते त्यात रंगून जात होते.
समर्थांच्याच ‘कल्याणकारी रामराया ‘ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?September 17, 2016
6.30 AM
ठिकाणकाटदरे सभागृह , बदलापूर (पूर्व)
पत्ताकाटदरे सभागृह , बदलापूर (पूर्व)
प्रमुख पाहुणेसौ. धनश्री लेले

फोटो गॅलरी