चैत्रपालवी – संगीतमय प्रवासाची दशकपूर्ती

चैत्रपालवी संगीतोत्सव चतुरंगच्या श्रुंगार उपक्रमांपैकी एक आहे. प्रतिवर्षी चतुरंगचा वर्धापन दिन रसिक आणि कलाकरांसमवेत चैत्रपालवीतून साजरा होतो. एका बुजूर्ग कलाकाराचा सन्मान आणि उदयोन्मुख युवा कलाकाराला जाणत्या श्रोत्यांचे व्यासपीठा उभारून देणे हा या मागचा उद्देश.
यंदाच्या वर्षी चैत्रपालवीची दशकपूर्ती डोंबिवलीच्या सयोग मंगल कार्यालयात संपन्न झाली. चतुरंग संगीत सन्मानाचे मानकरी होते औरंगाबाद चे पं. नाथ नेरळकर. त्याच बरोबर युवा कलाकार गंधार देशपांडे चतुरंग शिष्यवृत्ती चा मानकरी होता. सोबत अनेक संगीतमय नावं चिंतन कट्टी (तबला), सारंग कुलकर्णी(सरोद), अनुराधा कुबेर (गायन) यांची मेजवानी डोंबिवलीकरांना मिळाली. चतुरंग संगीत सन्मान व शिष्यवृत्ती, उद्योग आणि कोर्पोरेट क्षेत्रातील एक समर्थ नाव दिपक घैसास यांच्या हस्ते देण्यात आली. सोबतच श्री विश्वनाथ शिरोडकर, शुभदा पावगी, सदाशिव बाक्रे अशा अनेक संगीतप्रेमी मान्यवरांची मांदियाळी चतुरंगला लाभली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चतुरंग वर्धापन दिन रसिक आणि कलाकरांना संगीत सम्रूद्ध करत पार पडला

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?May 13, 2017
4.00 PM
ठिकाणसयोग मंगल कार्यालय,डोंबिवली
पत्तासयोग मंगल कार्यालय,डोंबिवली
प्रमुख पाहुणेपं. नाथ नेरळकर,युवा कलाकार गंधार देशपांडे,चिंतन कट्टी (तबला), सारंग कुलकर्णी(सरोद), अनुराधा कुबेर (गायन)

फोटो गॅलरी