विविध बँका, एल.आय.सी. वा तत्सम कार्यालयातील नोकरी ही प्रतिष्ठेची समजली जात असली तरी ही नोकरी प्राप्त करण्यासाठी आवश्यकता असते ती स्पर्धात्मक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची! आवश्यक ती किमान शैक्षणिक पात्रता असूनही मराठी मुलं या परीक्षेत मागे पडतात कारण त्यांना परीक्षेसाठी उपलब्ध वेळ आणि प्रश्नपत्रिका यांचा ताळमेळ कसा घालावा याचं नेमकं तंत्र अवगत नसतं. या संदर्भात मुंबई आणि अन्यत्र मोठया रक्कमेतील घसघशीत फी भरून खाजगी क्लासेस उपलब्ध असले, तरी चिपळूण आणि कोकण परिसरात त्याची दुर्लभता आहेच. नोकरीसाठी उत्सुक असलेल्यांची ही अडचण लक्षात आल्यामुळे वर्ष २०१३ पासून चतुरंग चिपळूण कार्यालयातील `क्लासरूम’मधे विद्यार्थ्यांना या विषयाचे मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. यात विशेष करून गणित, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि संगणकाचा वापर या विषयांना प्राधान्य देण्यात येते. स्पर्धेसाठी नियोजित केलेला अध्यापक वर्ग हा राष्ट्रीयकृत बँकांमधून निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा असल्यामुळे उमेदवार विद्यार्थ्यांना या स्पर्धांसंदर्भात नेमके आणि सुयोग्य मार्गदर्शन केले जाते.
आगामी कार्यक्रम
सध्या उपलब्ध नाहीत.
अहवाल
गुणवंत गौरव सोहळा
चतुरंग रंगसंमेलन
चतुरंग वर्धापनदिन
चैत्रपालवी संगीतोत्सव
दिवाळी पहाट
निवासी वर्ग निकाल
पालक मेळावा
पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ
मुक्तसंध्या
विशेष उपक्रम
शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग
श्रवणानंद
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
सवाई एकांकिका
सवाई एकांकिकोत्सव
स्वातंत्र्याचे पूर्वरंग
प्रशस्तिपत्रे

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.

समान विचारांच्या मित्रांनी ,समान उद्दिष्टासाठी ,समान पातळीवर राहून चालविलेलं हे कार्य आहे . ही कार्यपध्दतीने मला इतरत्र कुठे दिसली नाही . त्यामुळेच मला या संस्थेसंबंधी कुतूहल आणि आदर वाटतो.