आधुनिक भारतीय रंगभूमी आणि गोवा!

दि. ११ ऑगस्ट २०१९ रोजी राजीव गांधी कला मंदिर फोंडामधील ‘अरेना’ या छोटेखानी सभागृहामध्ये सं.४-४५ ते ६-४५ या वेळेंत गोव्यातील नाट्यक्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या सौ.अनघा व श्री. साईश देशपांडे या दम्पतीची प्रा. संगीता अभ्यंकर यांनी मुक्तसंध्या कार्यक्रमांतर्गत घेतलेली मुलाखत खूप रंगली. त्या दोघांचा नाट्यक्षेत्रातील प्रवेश व नंतरचा प्रवास, जागतिक व भारतीय रंगभूमीचा त्यांचा अभ्यास तसेच गोव्यातील नाट्यचळवळीविषयीचे त्यांचे स्पष्ट विचार यांविषयी प्रा. संगीता अभ्यंकर यांनी त्याना बोलते केले. गोव्यात नाट्यक्षेत्रांत चमकण्यासारखे खूप कलाकार आहेत पण कुठेतरी प्रयत्न कमी पडतायत असे त्यांना वाटते. लोककला नाटकात वापरून वेगवेगळे प्रयोग व्हायला हवेत. आपली लोककला कायमस्वरूपी एका विशिष्ट ठिकाणी पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हायला हवी असेही त्यांचे म्हणणे पडले. नंतर झालेल्या चर्चेत ‘पर्यटकांना आपल्या लोककला दाखवून नाट्यक्षेत्राला कोणता फायदा आहे’ अशी शंका घेण्यात आली असतां त्याच्यासाठी वेगळी समांतर व्यवस्था असावी लागेल असा सूर निघाला. या कार्यक्रमाला फोंडा परिसरातील ज्येष्ठ रंगकर्मी मोठ्या संख्येने हजर होते. यंदाच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या “ अव्याहत “ या नाटकाचे दिग्दर्शक , हंस संगीत नाट्य मंडळाचे श्री. विजयकुमार नाईक यांच्या हस्ते अत्तरकुपी व गुलाबपुष्प देऊन तिन्ही मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सौ. सुनीती मराठे यांनी प्रास्ताविक व ऋणनिर्देश केला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?August 11, 2019
4.45 PM
ठिकाणराजीव कला मंदिर, अरेना सभागृह, गोवा
पत्ताराजीव कला मंदिर, अरेना सभागृह, गोवा
प्रमुख पाहुणेसौ. अनघा देशपांडे, श्री. साईश देशपांडे, प्रा. संगीत अभ्यंकर.

फोटो गॅलरी