आनंद इंगळे

रविवार १० जुलै २०१६ रोजी चतुरंग गोवा आयोजित ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ ‘ उपक्रमा अंतर्गत ,नाटक ,सिनेमा ,दूरदर्शन ,मालिका इत्यादी माध्यमांतून स्वतः:च्या अभिनयाचा ठसा उमटविणारे सुप्रसिद्ध कलाकार श्री. आनंद इंगळे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी गोवेकर रसिकांना लाभली. एखादा कलाकार वलयाबाहेर येऊन जेव्हा सामान्य रसिकांमध्ये मिसळून जातो तेव्हा रसिकांना तो अधिक जवळचा वाटू लागतो . साचेबद्ध मुलाखतीमध्ये मुलाखतकार रसिकांच्या मनातील संभाव्य प्रश्न विचारून कलाकाराचे व्यक्तिमत्व उलगडत असतो ,परंतु खुल्या मुलाखतीमध्ये रसिकांपैकी कुणीही थेट प्रश्न विचारु शकतो . आनंद इंगळेंसारखा मनस्वी कलाकार जेव्हा या गप्पांमधे गुंतत जातो तेव्हा कलाकार आणि रसिक यांच्यातील औपचारिकता गळून पडते. हा कार्यक्रम ही तसाच रंगला.
“नाम ” या दुष्काळग्रस्थ शेतकरी लोकांसाठी झटणाऱ्या संस्थेसाठी निधी गोळा करणाऱ्या आनंद इंगळेनी आपला सामाजिक पैलूही अधोरेखित केला दूरदर्शन वरील टुकार विनोद आणि अतिशयोक्तीपूर्ण अभिनयाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली . राजकारण ,भ्रष्टाचार ,समाजकारण ,शिक्षणपद्धती याविषयीही ते पोटतिडकीने बोलले . कलाकाराला स्वतः:च्या मनातलं ,अगदी आतून जाणवणारं काहीतरी सांगायचां असतं आणि त्यासाठी अशा अनौपचारिक गप्पांचं स्वरूप अनुकूल असतं हे चतुरंग ने ‘पुन्हा ‘ अधोरेखित केले .
आनंद इंगळे यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांसोबत जवळून गप्पा मारणे ही गोवेकर रसिकांसाठी पर्वणीच ठरली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?July 10, 2016
5.00 PM
ठिकाणगोवा
पत्तागोवा
प्रमुख पाहुणेआनंद इंगळे

फोटो गॅलरी