चतुरंग प्रतिष्ठानचा अभिमान मूर्ती पुरस्कार प्रदान सोहळा
अभिमान मूर्ती पुरस्कार प्रदान सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी त्रिमूर्ती भवन प्रधानमंत्री वस्तुसंग्रहालय सभागृह, दिल्ली

चतुरंग प्रतिष्ठानचा अभिमान मूर्ती पुरस्कार प्रदान सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी त्रिमूर्ती भवन प्रधानमंत्री वस्तुसंग्रहालय सभागृह, दिल्ली येथे संपन्न झाला.२०१८ साली हा पुरस्कार स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना (मरणोत्तर) जाहीर केला. हा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनी स्वीकारला. या सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट चे पदाधिकारी महेशचंद्रजी शर्मा उपस्थित होते. हा पुरस्कार कायमस्वरूपी जतन करण्यासाठी अटलजींच्या कुटुंबीयांनी प्रधानमंत्री वस्तू संग्रहालयाला सुपूर्द केला. प्रधानमंत्री वस्तू संग्रहालयाच्या वतीने चेअरमन न्रिपेंद्र मिस्रा यांनी तो स्वीकारला.

बाईपण भारी देवा
बाईपण भारी देवा

केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाची भारी टीम चतुरंगच्या मुक्तसंध्या उपक्रमातंर्गत मुलाखतीद्वारा रसिकांशी या चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी रविवार , दिनांक १३ ऑगस्ट , २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात डोंबिवली पूर्वेतील सुयोग मंगल कार्यालयात जमली होती. दिग्दर्शक श्री.केदार शिंदे यांच्यासह जियो सिनेमाचे श्री.निखिल साने आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते , सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांना बोलतं करुन त्यांच्याशी गप्पांद्वारा या चित्रपटाचा प्रवास उलगडून दाखविण्यासाठी मुलाखतकाराच्या भूमिकेत होत्या  अत्यंत अभ्यासू आणि मर्मज्ञ अशा सुप्रसिद्ध निवेदिका , सूत्रसंचालक  डॉक्टर समीरा गुजर-जोशी. 

Purvarang
" संस्कृतीचे भान राखत, जतन करत भारताला विश्वगुरू व्हायचे आहे " चतुरंग मुक्तसंध्येत शरद पोंक्षेंचे प्रतिपादन.

चतुरंग प्रतिष्ठान तर्फे आयोजित स्वातंत्र्याचे पूर्वरंग उपक्रमात प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि वक्ते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाला रत्नागिरीकर रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

32वे रंगसंमेलन ,डोंबिवली
३२ वे डोंबिवली रंगसंमेलन आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा

३२ व्या डोंबिवली रंगसंमेलानात दुर्ग संशोधक - लेखक श्री. बाळकृष्ण तथा अप्पा परब यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ATS प्रमुख श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत श्री. सुधीर जोगळेकर, श्री. वासुदेव कामत, सौ. मंजिरी मराठे आदी उपस्थित होते.

30वे रंगसंमेलन ,गोवा
३० वे गोवा रंगसंमेलन

३० व्या गोवा रंगसंमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, सुधीर जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

31वे रंगसंमेलन ,पुणे
३१ वे पुणे रंगसंमेलन

३१ व्या पुणे रंगसंमेलनात डॉ. प्रभाकर मांडे यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत निवड समिती अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. गो. बं. देगलुरकर, डॉ. नितीन करमळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चतुरंग म्हणजे...

अभिमानपूर्वक नमस्कार !

'चतुरंग म्हणजे काय ?' असं कुणी विचारलं तर नेमकं काय सांगायचं, असा प्रश्न केवळ इतरांना नव्हे तर कधी कधी खुद्द चतुरंगलाही पडतो. स्पष्टपणे एक जाणवतं कि 'चतुरंग'... अधिक वाचा

आगामी कार्यक्रम
सध्या उपलब्ध नाहीत.
अहवाल

चतुरंग वर्धापनदिन

चतुरंग होलिकोत्सव

पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ

खास मार्गदर्शन करणारे पंधरवड्याचे...
कोणालाही अभिमानच वाटावा अशा राष्ट्रीय कामगिरीनिमित्त आदरणीय व्यक्तीला दिला जाणारा
कोणत्याही कारण-निमित्ताशिवाय रसिक-कलाकारांच्या सहवास-संवादाची...
गाजलेल्या `एक संध्याकाळ'चे पुनर्निमाण ...
अनेक एकांकिका स्पर्धेतल्या प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धकांची जल्लोषपूर्ण वातावरणात होणारी आणि प्रतिवर्षी प्रजासत्ताकदिनी संपूर्ण रात्रभर चालणारी
दहावी S.S.C.च्या निकालानुसार चतुरंग अभ्यासवर्गातील गुणवंतांचे कौतुक करणारा आणि प्रतिभा मोने / चिंतामणी काणे शिष्यवृत्ती प्रदानाचा ...
कार्यकर्तावृत्तीच्या संगोपनासोबतच कार्यकर्ताप्रवृत्तीचं संवर्धन करणारं...
विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करताना आयोजनाच्या त्या त्या टप्प्यावर त्या विषयाच्या पाऊलखुणा मागे राहाव्यात...
अक्षयतृतीया हा चतुरंगचा वर्धापनदिन !...
बुजुर्गांची शाबासकी मिळवलेल्या तरूण गायक-वादक कलाकारांनी जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीत बहारदारपणे रंगवावयाचा...
साडेपाच हजार रसिकांच्या स्वेच्छानिधीतून उभारलेला आणि स्वीकृत क्षेत्रासाठी आयुष्य झोकून निस्वार्थीपणे कार्य करणा-या सर्वश्रेष्ठ व्यक्तीला मानपत्र आणि सन्मानचिन्हासहीत दिला जाणारा एक लक्ष रुपयांचा....
सामाजिक समरसता व दिवाळी आनंद साधणारी...
कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारी...
कमी गुणवत्तेच्या मुलांसाठी दिवाळी सुट्टीत...
स्वतला नोकर न मानता पिढी घडविणारा शिल्पकार मानण्याची आणि सर्वोत्कृष्ट शिक्षक बनण्याची आत्मप्रेरणा जागविणारा...
चतुरंगी शिक्षकांचे एकत्रिकरण साधणारे...
कोकण शाळांतील बहुगुणी विद्यार्थ्यांचा गौरव करणारा...
साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, चित्र अशा विविधांगी कलांचा एकत्रित मिलाफ असणारे साडेतीन-चार हजारांच्या उपस्थितीत होणारे भव्यस्वरूपी...
विविध विषयांवरील श्रवणीय व्याख्यानांचा शब्दसोहळा...
चैत्रपालवी संगीतोत्सवाला एक रूपेरी कडा लाभली ती `चतुरंग संगीत सन्मान' आणि `चतुरंग संगीत शिष्यवृत्ती' या दोन पुरस्कारांची...
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, स्वातंत्र्य मिळवून देणा-या स्फूर्तिशाली व्यक्तिमत्वांचे, घटनांचे, देशभक्तांचे चेतनादायी स्मरण करायला लावणारा उपक्रम...
दरवर्षीच्या ‘सवाई'नंतर वाटत राहायचे की, इतक्या छान, वेगवेगळ्या बाजाच्या, नवा ट्रेंड असलेल्या एकांकिका, शेवटी केवळ मुंबई-पुणे शहरांसारख्या परिघातच अडकणार का? तो परिघ ओलांडून त्या कोकणात, पश्चिम महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात, विदर्भातल्या खेड्यांत पोहोचणार
होलिकोत्सव हा स्थानिक पातळीसाठी सोयीचा म्हणून केवळ डोंबिवलीत साकारलेला उपक्रम! ‘त्रिवेणी' जशी नवोदित गायक-गायिकांसाठी होती, तशीच विविध गुण वा कौशल्ये संपादितांना मंच देणारा हा उपक्रम
दिवाळी पहाट
विशेष कार्यक्रम