वंदना गुप्ते

चतुरंग प्रतिष्ठान , पुणे आयोजित ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ ह्या कार्यक्रमात पुणेकर रसिकांनी सुप्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री वंदना गुप्ते ह्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
नाटक, मालिका, सिनेमा, निर्मिती आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली कट्टा’ ह्या चित्रपटाद्वारे ‘दिग्दर्शन’ क्षेत्रातील दमदार पदार्पण हा सर्व कॅलिडोस्कोप वंदना ताईंनी आपल्या रसाळ विनोदी आणि तितक्याच सिद्धहस्त संवादशैलीत उभा केला.
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कै. माणिक वर्मा यांच्या मायेचं ( आईचं ) छत्र मिळालेल्या वंदना ताईंना बालपणापासूनच गायनाची तालीम ( बाळकडू ) मिळाले.परंतु, घरात संगीताचे वातावरण असतानाही त्यांचा जीव रंगला तो अभिनयात.’झुंज’, ‘वाडा-चिरेबंदी’, ‘चारचौघी’ सारखं काळाच्या खूप पुढे असणारे नाटक, ‘श्री तशी सौ’ यांसारख्या अनेकविध नाटकांमधून त्यांचा अभिनय बहरत गेला. ‘विनोदी नाटक करताना अधिक गंभीर व्हावं लागतं’ हे त्यांचे विचार नाटकाबद्दलचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन सिद्ध करतात.
नाटकांच्या दौऱ्यानिमित्त ८-१० दिवस घराबाहेर असताना देखील घरातील प्रॉब्लेम्स सेटवर येणार नाहीत, हा कटाक्ष त्यांनी आजपर्यंत पाळला, कदाचित,म्हणूनच एक अभिनेत्री बरोबरच एक गृहिणी म्हणून देखील त्या तितक्याच समर्थपणे भूमिका निभावू शकल्या.
या संपूर्ण गप्पांच्या मैफिलीची सुरमयी सांगता पिंकी वर्मा यांच्या सुरेल आवाजातील ‘घननीळा, लडिवाळा’ या गाण्याने झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?November 26, 2016
6.00 PM
ठिकाणशैलेश सभागृह ,कर्वेनगर ,पुणे
पत्ताशैलेश सभागृह ,कर्वेनगर ,पुणे
प्रमुख पाहुणेवंदना गुप्ते

फोटो गॅलरी