हॅम्लेट : एक शिवधनुष्य

चतुरंग आणि रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने “मुक्तसंध्या” या उपक्रमात दिनांक 3 फेब्रु. 2019 रोजी ‘हॅम्लेट’ या नाटकातील कलाकारांची मुलाखत घेण्यात आली.यामध्ये तुषार दळवी, मुग्धा गोडबोले, सुनील तावडे , श्रीपाद पद्माकर आणि सुमित राघवन उपस्थित होते.’हॅम्लेट -एक शिवधनुष्य’ यावर कलाकारांनी आपले अनुभव सांगितले आणि रत्नागिरीकर रसिक श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घेतला.कलाकारांची आणि त्यांच्या अभिनयातील विविधता या बाबत ओळख करून देत श्री.वामन पंडित यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली.हॅम्लेट हे एक शिवधनुष्य कसे ? या बाबत सगळ्याच कलाकारांनी मनमोकळेपणे आपले अनुभव सांगितले.उत्तम दर्जाची मराठी भाषा त्यामुळे त्यातल्या वाक्यांचा प्रचंड सराव, शब्दांचे चढ-उतार , अभिनय आणि हावभाव यातील कंगोरे या सगळ्यांवर कलाकारांनी प्रचंड काम केले.या नाटकामुळे अभिनय क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे पडले.अशा प्रकारची भावना सगळ्याच कलाकारांनी मांडली. एक वेगळ्या प्रकारचे नाटक ८० लोकांच्या टीम सोबत आणि २२ कलाकारांसोबत करणं आणि त्यातील उत्तमत्व लोकांपर्यत पोहोचवणम हे मोठं शिवधनुष्य उचलल्याचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला.या पूर्ण कार्यक्रमात दिग्दर्शक श्री.चंद्रकांत कुलकर्णी यांची उणीव भासली आणि त्यांच्या उत्तम दिग्दर्शनाचा सगळ्यांनीच उल्लेख केला.चतुरंगच्या २८जीवनगौरव पुरस्कारांच्या चित्रफितीने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?February 3, 2019
5.30 AM
ठिकाणनगर वाचनालय, रत्नागिरी
पत्तानगर वाचनालय, रत्नागिरी

फोटो गॅलरी