महाभारत- एक सूडाचा प्रवास

दाजी पणशीकरांच नाव आपण एक व्यासंगी लेखक, विचारवंत आणि व्याख्याते म्हणून ऐकल आहेच. महाभारत हे सूडाचं शास्त्र समोर आलं ते दाजींमुळेच. महाभारत एक गुढ शास्त्र आहे, त्याचे अनेक पैलू दाजींकडुन उलगडत गेले. निमित्त होतं चतुरंग आणि ब्राह्मण सेवा मंडळ आयोजित श्रवणानंद. २७ आणि २८ एप्रिल २०१७ रोजी हा कार्यक्रम ब्राह्मण सेवा मंडळात पार पडला.
महाभारतातील स्रिया हा प्रामुख्याने विषय होता. पहिल्या दिवशी राजमाता कुंती आणि दूसर्या दिवशी अग्नीकन्या द्रौपदी या विषयांवर दाजी शास्त्री बोलले. या दोन स्त्रिया आपल्याला फक्त व्यक्तीरेखा म्हणून माहित होत्या परंतु दाजींनी त्यांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला व त्यांच्या अस्तिवाचे अनेक पैलू रसिकांना सांगितले. महाभारतातील स्त्रिया हा महत्त्वाचा विषय आहे, तो यासाठी कारण त्या काळात स्रियांचे अस्तित्त्व पणाला होते परंतु तरीही ह्या दोन्ही स्त्रियांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्या सुंदर होत्या, विनयशील होत्या, राजकन्या होत्या… इतिहासाने त्यांची दखल घेतली परंतु जगाला त्यांचं सार्मथ्य कळू शकलं नाही. म्हणूनच दाजी म्हणतात “चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे कारण त्या करण्यासाठी चांगली माणसे आहेत हे जगाला कळायला हवे.
सूडाचा प्रवास जितका महत्त्वाचा आहे त्याहून ही जास्त ह्या दोघींची त्यातील भूमिका महत्त्वाची आहे. या दोन्ही स्त्रिया कौरव पांडवांना जोडून ठेवणारा धागा होत्या पण महाभारत घडण्यामागचं कारणही त्याचं होत्या. दाजींसारख्या व्याख्यात्याचे मोठेपणही इथेच दिसते. प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका कारणासकट मांडत त्यांनी रसिकांना दोन तास गुंग केले. तसेच काळानुसार हा सूडाचा प्रवास इतका मोठा होत गेला की महाभारताच्या पाच पिढ्यांमध्ये सूडाचं शास्त्र आहे असं दाजी सांगतात. हा सूडाचा प्रवास असला तरीही विद्येचं देणं हे विद्येनेच फेडावं लागतं, कपटाने नाही, हे ह्यातून सिध्द होते. कर्ण खरा कोण होता, कपटनिती, भार्वार्थ रामायण, महाभारत-एक सूडाचा प्रवास अशी एक न अनेक १२ पुस्तके दाजींच्या नावावर आहेत. दाजींचे १९२५ वे व्याख्यान चतुरंग आणि ब्राह्मण सेवा मंडळाच्या रसिकांसमवेत पार पडले.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?April 27, 2017
6.15 PM
ठिकाणब्राह्मण सेवा मंडळ,भवानी शंकर रोड , दादर
पत्ताब्राह्मण सेवा मंडळ,भवानी शंकर रोड , दादर
प्रमुख पाहुणेव्याख्याते श्री.दाजी पणशीकर

फोटो गॅलरी