गुणवंत गौरव सोहळा २०१९

शिक्षण पद्धतीचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी आणि अश्याच कोकणातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम निवासी व निर्धार वर्गातून चतुरंग प्रतिष्ठान गेली २२ वर्षे सातत्याने करत आली आहे. अशाच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक करण्यासाठी दि. ७ जुलै २०१९ ला चिपळूणातील ब्राह्मण सहाय्यक मंडळाच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी तरुण वर्गाला भुरळ पडणारा अभिनेता,लेखक आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच DBJ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मीनल ओक ही हजर आणि अभ्यास वर्गातील ज्येष्ठ शिक्षक श्री. दीपक मराठे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तिवरे येथील धरण दुर्घटनेमधील मृतांत्म्यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. चतुरंग कार्यकर्ते रणजित काळे यांनी प्रास्ताविकात या गौरव सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला.यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून दीपक मराठे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी संबोधित केले.
यानंतर अद्वैत दादरकर व मीनल ओक यांच्या हस्ते ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच कोकणातील शिक्षणासाठी कायम तत्पर असलेल्या स्व.प्रतिभा मोने आणि स्व.मामा काणे स्म्रृतीप्रित्यर्थ चतुरंग शिष्यवृत्ती सहा जणांना प्रदान करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेल्या प्रा. मीनल ओक बोलताना म्हणाल्या, “विद्यार्थ्याने गुणांचं मूल्यांकन Quantity ने नाही तर Quality ने करावं तसेच विद्यार्थ्यांचा प्रवास गुणवंत ते ज्ञानवंत असा व्हावा आणि यासाठी शैक्षणिक प्रक्रिया आणि प्रवास ही त्यांची शिदोरी असावी.”
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अद्वैत दादरकर यांनी विद्यार्थ्यांशी मित्र बनून संवाद साधला. यात त्यांनी स्वतःचे विद्यार्थी दशेतील कडू गोड प्रसंग सांगितले. तसेच, ‘अभ्यासाचं व अपेक्षांचं ओझं न घेता अभ्यास enjoy करा आणि सर्व प्रकारचे अनुभव घ्या’ असा मोलाचा सल्ला दिला.
या गौरव सोहळ्याची सांगता ऋणनिर्देशाने झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?July 7, 2019
11.00 AM
ठिकाणब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण
पत्ताब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण
प्रमुख पाहुणेश्री. अद्वैत दादरकर, प्रा. सौ. मीनल ओक

फोटो गॅलरी